दिवसाढवळ्या संशयामुळे पतीने पत्नीची चॉपरने हत्या केली

Written By : Sayed Tanzeem Ali

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीला सोमवारी एका दिवसापूर्वी बाजारपेठेत पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली, अशी महिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आनंद रामभाऊ वाघमारे (४६) आणि त्यांची पत्नी मीना (४०) यांचे अनेकदा भांडण होत असे आणि अशाच एका वादानंतर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वरळा देवी मंदिराजवळील बाजारात चॉपरने वार करून तिची हत्या केली. सदर घटना १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास वरळा देवी मंदिराजवळील धामणकर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या मानेवर, खांद्यावर, छातीवर, कंबरेला आणि पोटावर गंभीर दुखापत झाल्या होत्या. ज्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गंभीर जखमा आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे भिवंडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. भिवंडी पोलिसांनी रोहित राहुल वाघमारे (२०) वर्षे यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२ अन्वये अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी आनंद वाघमारे याला न्यायालयात हजर केले असता २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती भिवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली. भिवंडी पोलिसांना तपासादरम्यान आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे निष्पन्न झाले, या हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे का, हेही पोलीस तपासत आहेत.

Comments

Popular posts from this blog

मुंब्रा टोरेंट पावर कंपनी के खिलाफ मीम का घर घर सर्वे शुरू !

मुंब्रा में प्रशासन की लापरवाही सेअग्निवीर भर्ती के लिए आये युवाओं का हो रहा बुरा हाल,ट्रस्ट ने संभाली कमान !

कोसी नदी के तटबंध की मरम्मत में बरती गई लापरवाही, भारतीय किसान यूनियन अन्नदाता ने तहसील सदर में प्रदर्शन कर सौंपा ज्ञापन !